FREE Android Apps ची दुनिया

आजकाल आपला Oxygen १५ मिनिटे बंद असेल तरी चालतो पण Android Phone ५ मिनिटे बंद असला कि जीव वर-खाली होतो. डोक्यावर हेल्मेट नसेल तरी चालते पण Phone ला Screen Guard पाहिजे. सीम कार्ड ला नेटवर्क नसेल तरी चालते पण Wi-Fi मात्र पाहिजे. Candy Crush Saga खेळताना वेळ कसा निघून जातो ते समजतच नाही. फक्त लेव्हल्सची शर्यत लागलेली असते. आता बघुयात या फ्री Apps च्या जाळ्यात आपण कुठपर्यंत अडकले जाऊ शकतो ?

जास्तीत जास्त वापरले जाणारे Apps म्हणजे WhatsApp, WeChat, Facebook, CandyCrush Saga, Line, Viber etc. आता हे Apps आपल्याकडून पैसे घेत नाहीत उत्तम सेवाही देतात. आज ७०० मिलियन लोकांचा डाटा सांभाळायला किती खर्च लागत असेल, बरेच मिलियन डॉलर्स लागतात. आज Candy Crush Saga चा turnover twitter.com पेक्षा २ पट आहे. हे कसे ? नक्की कसे कमावतात हे पैसे ? आपण का एवढे वेडे होऊन Apps वापरतो आणि त्यांना अब्जादिश बनवतो ? फक्त ते पैसे कमावत नाहीत तर तुमच्या फोनचा Access घेतात. तुमचा Camera, Call logs, Contacts, Wi-Fi networks, Bluetooth, Microphone, Photos, Device Id या सर्व गोष्टींची किल्ली आपण त्या App च्या हाती देतो.
खालील काही उदाहरणे बघा:

Whats Appwhats app Facebook
facebook
Candy Crush Sagacandycrush We Chat
wechaat

 Viber

viber

 Line

line

काय ? झालात का आश्चर्य चकित ?

Apps आणि युजर्स :

Whats App 700 Million
Facebook 1 Billion
Candy Crush 100 Million
WeChat 100 Million
Viber 100 Million
Line 100 Million
Source: Google play store

आणि बरेच हौशे गवशे Apps आपण वापरत असतो. विचार करा एवढ्या मिलियन, बिलिअन लोकांच्या फोनचे Camera, Photo, Video, Contact lists, Call Logs, Locations, Bluetooth, Wi-fi network हे Apps वापरतात ह्या Internet वर काही फ्री मिळत नसते, हे लक्षात ठेवा.

पण आता करणार काय ?
Whats App म्हणजे आपण सोडूच शकत नाही. Facebook शिवाय राहू शकत नाही. Candy Crush मध्ये लेवल्सच्या शर्यतीत गुंतलेलो असतो.
प्रत्येक App जो तुम्ही वापरता त्याची माहिती Wikipedia मध्ये सर्च करा व Privacy नावाच्या section मध्ये वाचा नक्की तुमच्या डेटा सोबत काय होते ? असेच एकदा मी ‘We Chat’ ह्या App ची माहिती Wikipedia वर सर्च करत असताना, Privacy मध्ये वाचले कि, ‘We Chat’ हा App China च्या Intelligence Agence ‘qq.com’ यांनी Spying साठी तयार केलेला आहे. हि माहिती भारताच्या Intelligence Beaureu ने दिली आहे. तसेच Whats App हा जास्त वापरला जाणारा App आहे, त्याबद्दल पण वाचा.

कृपा करून Apps डाउनलोड करण्याच्यावेळी त्यांच्या अटी व नियम वाचा. फक्त scroll करून Accept करू नका. आपण म्हणतो माझ्या फोन ला Patern लॉक आहे, अमुक लॉक आहे, तुम्हीच तुमच्या फोनच्या डेटाची किल्ली Appsच्या हाती दिल्यावर काय उपयोगाचे हे लॉक्स.

अधिक माहितीसाठी:
Nikhil Mahadeshwar +91 9773170378
nikhil@cybersecuredindia.com
www.cybersecuredindia.com